कुजबुज, भावतरंग, शुभस्वर आणि खूप काही ..

मित्रांनो- मला असे वाटते कि आपल्या सर्वांच्या मनात खूप काही चाललेले असते. क्षणा क्षणाला घडणारया गोष्टींचे तरंग मनामध्ये उमटत असतात. बरेच शब्द कानात कुजबुजत असतात. माझ्याही मनामध्ये अशीच शब्दांची किलबिल सुरु आहे. हीच किलबिल मला तुम्हालाही ऐकवायची आहे, ऐखादी गोष्ट कागदावर उतरवल्यावर कदाचित मलाही नव्याने अनुभवायला मिळेल.. म्हणूनच हा blog चा खटाटोप. ह्याच किलबिलाटात मला ऐकू आलेल्या जाणवलेल्या भावनांचे तरंग, शुभ असे स्वर. आपली माती, मराठमोळी माणसं. रक्त सळसळवनारा रांगडा इतिहास, महाराष्ट्राला पूजनीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व....अजून बरंच काही सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न...

Tuesday 1 May 2012

महाराष्ट्राची हाक ...

मित्रांनो,

आज सहा महिन्यांपेक्षा ज्यास्त दिवस झाले मला ह्या Blog ची सुरुवात करून..सुरुवात म्हणजे फक्त कवर पेज design केले होते, आता design कसले तर, blogspot वरून मला आवडलेली Template निवडली जी मला अभिप्रेत असलेल्या विषयाला मिळतीजुळती होती,आणि Blog चा श्री गणेशा केला. कित्येकदा ठरवले आज लिहू, आता लिहू पण मुहूर्त काही लागत नव्हता,खरेतर मनातल्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे मनामध्ये उठणाऱ्या आवर्तानाना मांडण्यासाठी हा Blog बनवला पण ह्या ना त्या  कारणांनी प्रत्येक वेळी मी माझ्या शब्दांची किलबिल कागदावर उतरवू शकलो नाही.

आज पुन्हा प्रयत्न करतो आहे, पण ह्यात सुद्धा एक पळवाट आहे. मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता.. दैनिकात देण्यासाठी; निमित्त होते महाराष्ट्रदिनाचे, आणि आजही तोच Trigger Point आहे. त्या लेखाचे नाव होते "महाराष्ट्रची हाक" ज्या मध्ये मी अश्या एका तरुणाच्या मनातील कल्लोळ व्यक्त करायचा प्रयत्न केला होता जो कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर,युरोप मध्ये असतो पण त्याचे हृदय त्याच्या मातीमधेच घुटमळत असते. मघाशी पळवाट ह्या साठी म्हणालो कारण तोच लेख मी आज इथे टाकत आहे, .काय योगायोग आहे पहा ह्या महाराष्ट्रदिनी मी युरोप मध्ये आहे.